पुष्पांजलि ही तुम्हा अर्पितो, दत्त गुरु सदया।
तवपदी वंदन करण्या स्फुर्ती द्यावी या ह्रदया।
तुलसी बेल आणि फुले सुवासित, नाना विधी माला,
अर्पित असे बहू प्रेमभरे, आम्हीं श्रीगुरु चरणाला।
किंचित सेवा भजन पुजन हे, घडले या चरणी,
गोड करुनी घ्या प्रेमे आमुची, भक्तांची करणी।
दिनदयाळा भक्तवत्स्ला, श्रीगुरु यति राया,
पुष्पगंध हा सदा अर्पितो, प्रेमे तव पाया।
साधुसंत देवादिक हे, नमिती तव पायी,
धन्य मानीती ते आपल्याला, संशय मुळी नाही।
अत्रीरुषी अनुसुया सूता तु, अवतरला कलिया,
ऊध्दरण्याला भक्तजनाला, हरुनी पापलया।
दिन दयाळा आम्ही लेकुरे, शरण तुम्हा आलो,
भक्ती प्रेम पूष्पांजली ही वाहण्याला सजलो।